Rashmika Mandanna – साऊथची स्टार रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ‘नॅशनल क्रश’ आहे. ‘पुष्पा : द राइज’नंतर रश्मिका घराघरात प्रसिद्ध झाली. चित्रपट हिट झाल्यानंतर रश्मिकाची फॅन फॉलोइंग ज्या वेगाने वाढली आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. अश्यातच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल (Deepf ake Video) करण्यात आला आहे. बोल्ड स्वरूपातील हा व्हिडीओ फेक असल्याचे समोर आले. मूळ व्हिडिओतील व्यक्तीचा चेहरा मॉर्फ करून हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. (Rashmika Mandanna Viral Video)
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. व्हिडिओमधील खऱ्या महिलेचा चेहरा हटवून त्याजागी अभिनेत्रीचा चेहरा एडिट केल्यामुळे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. (Rashmika Mandanna edited video) आता यावर तो मूळ व्हिडीओ असलेल्या महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे.
हा मूळ व्हिडीओ झारा पटेल नामक व्यक्तीचा आहे.तिने देखील आता या सर्व प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिली आहे. घडलेल्या प्रकारामुळे तिने महिलांच्या सुरक्षित भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
तिने इंस्टाग्रामवर लिहिले की, “माझ्या लक्षात आले आहे की कोणीतरी माझे शरीर आणि एका लोकप्रिय अभिनेत्रीचा चेहरा वापरून डीपफेक व्हिडिओ तयार केला आहे. डीपफेक व्हिडिओशी माझा काहीही संबंध नाही आणि जे घडत आहे त्यामुळे मी खूप व्यथित आहे. मला स्त्रिया आणि मुलींच्या भवितव्याची काळजी वाटते ज्यांना आता सोशल मीडियावर स्वत: ला ठेवण्याची भीती वाटते.इंटरनेटवरील प्रत्येक गोष्ट खरी नसते, जे काही घडत आहे त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे.
Deep Fake म्हणजे काय ?
हा सिंथेटिक मीडियाचा प्रकार आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओतील व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने रिप्लेस करता येतो. अशा पद्धतीने बनावट फोटो किंवा व्हिडिओ बनवणे यात फारसे काही नवीन नाही. पण Deep Fake मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून अतिशय तंतोतंत बनावट व्हिडिओ किंवा फोटो बनवला जातो. चेहऱ्यावरील अनैसर्गिक भाग, डोळे आणि डोके यांच्यात समन्वय नसणे यातून Deep Fake व्हिडिओ ओळखता येतो.