नगर -करोनाबाधितांची दररोज वाढणारी संख्या नगरकरांना धडकी भरविणारी ठरत आहे. आज एकाच दिवशी तब्बल 35 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नगरमधील करोनाबाधितांची एकूण संख्या आता पाचशेच्या घरात पोचली आहे. जिल्ह्यात वाढलेल्या नव्या रुग्णांमध्ये एकट्या नगर शहरात 21, राहुरीत 4, कोपरगाव 3, अकोले 2, संगमनेर, पाथर्डी, राहाता, श्रीरामपूर व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
दरम्यान, आज आणखी पाच जणांनी करोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरानातून बरे होणाऱ्यांची संख्याही 312 झाली. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवलानुसार नगर शहरात सिद्धार्थनगर येथील 30 वर्षांचा पुरुष, सुडकेमळा येथील 50 वर्षांची महिला, पद्मानगर (पाइपलाइन) येथील 57 व 25 वर्षांची महिला, 60 वर्षांचा पुरुष, 11 वर्षांचा मुलगा आणि 30 वर्षांचा युवक बाधित आढळून आला आहे. यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हे सर्व रुग्ण आहेत.
याशिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ब्राह्मणवाडा (अकोले) येथील 26 वर्षांचा युवक व 17 वर्षांची युवती बाधित आढळून आली आहे. हे दोघे रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले होते. तसेच कुरण (संगमनेर) येथील 35 वर्षांच्या सक्रिय बाधित आहेत. तर करोनामुक्त झालेल्या बाधितांची संख्या 3 लाख 48 हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे देशातील करोनारूग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.43 टक्क्यांवर पोहचले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
90 वर्षांच्या आजीबाई करोनामुक्त
नगर शहरातील 90 वर्षांच्या आजीबाई आज करोनामुक्त झाल्या. त्या आजीबाईंसह पाच रुग्णांनी करोनावर विजय मिळविला. त्यामध्ये नगर शहरातील चार, श्रीरामपूर येथील एकाचा समावेश आहे. त्यांना रुग्णालयातून आज घरी सोडण्यात आले. 22 जूनला शहरातील आजीबाईंना त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीन दिवस त्या आयसीयू कक्षात होत्या. त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.