- 185 करोनाबाधितांची नोंद
- 279 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आज पुन्हा दोनशेच्या खाली आली आहे. आज शहरात 185 नवीन रुग्ण आढळले. तर 279 रुग्ण बरे झाले आहेत.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सोमवारी (दि. 28) शहरात 185 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 57 हजार 288 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 5 करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यापैकी 3 रुग्णांचा मृत्यू गेल्या 24 तासात झाला असून उर्वरित मृत्यू आधीचे आहेत. आजपर्यंत शहरातील 4276 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 279 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 51 हजार 810 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4708 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 845 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 354 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1199 इतकी आहे.