दिवसात 12 गावांत 38 बाधित, तालुक्याची संख्या 559वर
शिरूर – शहरासह तालुक्यात 12 गावांत 38 करोना बाधित रुग्ण आढळले असून, एका 54 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. शिरूर तालुक्यात करोनाचा आकडा 559 एवढा झाला आहे.
आज शिरूर येथील कोवीड केअर सेंटरमधून 26जणांचे करोना तपासणीकरिता नमुने घेण्यात आले आहेत. शिरूर तालुक्यात आता रोजच करोना बाधित रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात रुग्णवाढीत खेड पाठोपाठ शिरूर तालुक्याचा नंबर लागतो का काय, अशी भीती नागरिकांमध्ये आहे.
शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील 54 वर्षीय एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तालुक्यात शिरूर शहरात 5, कारेगाव 7, मलटण 2, शिक्रापूर 5, डिंग्रजवाडी 1, धानोरे 8, शिरूर ग्रामीण 3, तर्डोबावाडी 3, रांजणगाव गणपती 1, कोरेगाव भीमा 1, करंदी 1, केंदूर 1 अशा बारा गावांत 38 रुग्ण सापडले आहेत.