कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज सायंकाळी 7 च्या सुमारास उघडले आहेत.
स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 आणि क्रमांक 6 चे असे 2 दरवाजे एकाच वेळी उघडले असून या दोन्ही दरवाजातून 2 हजार 856 क्यूसेक चा विसर्ग सुरू झाला. दरम्यान, पायथा विद्युत गृहातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग यापूर्वीच सुरू असून आज राधानगरी धरणातून एकूण 4256 क्यूसेक चा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.