मुंबई – शरद केळकर मुख्य भूमिकेत असलेला हर हर महादेव या सिनेमावरून खूपच वाद निर्माण झाला होता. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. परंतु त्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटातबाबत आक्षेप नोंदवला होता.तब्बल ५ भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हर हर महादेव आता ओटीटीवर देखील प्रदर्शित होणार आहे.
‘रामसेतू’ आणि थँक गॉडला टक्कर देत हर हर महादेव या चित्रपटाने जबरदस्त व्यवसाय केला.आता ओटीटीवर हा चित्रपट हिंदीमध्ये पाहता येणार आहे. या चित्रपटात सुबोध भावेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेता शरद केळकर बाजी प्रभू देशपांडेंच्या भूमिकेत आहे.रिलीज नंतरही या चित्रपटाने मोठा वाद निर्माण केला होता.
‘हर हर महादेव’ हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. रिलीजनंतर सुमारे दीड महिन्यानंतर हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 वर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे झी 5 चे सब्स्क्रिप्शन असणाऱ्यांना हा चित्रपट फ्रीमध्ये पाहता येणार आहे. झी स्टुडिओच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून माहिती शेअर केली आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये पाहता येणार असला तरी ज्या सीन्सवरून वाद झाले ते सिन या चित्रपटात असणार की नसणार याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.