पिंपरी -जन्मदात्या आईचा आणि पोटच्या नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 21 आणि 26 एप्रिल रोजी अजंठानगर चिंचवड येथे घडली.
पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा मुलगा आहे. फिर्यादी महिलेची नऊ वर्षीय नातीचा फिर्यादी यांच्या मुलाने विनयभंग केला. तसेच फिर्यादी यांच्याशी अश्लील बोलून त्यांचाही विनयभंग केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.