नवी दिल्ली – भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार असलेल्या टीसीएस कंपनीचे शेअर बाजारातील मूल्य 13.5 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
बाजारमूल्याच्या बाबतीत सध्या टीसीएस बरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बॅंक आघाडीवर आहेत.
या कंपन्यांचे बाजारमूल्य 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे. सध्या शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहे. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची जोरात खरेदी चालू आहे.