बॉलिवूडमध्ये सुशांत सिंह राजपुतने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याच्या अखेरच्या “छिछोरे’ चित्रपटात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलाच्या वडिलांची भूमिका साकारलेल्या सुशांतने आज स्वत:चं आयुष्य संपवले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यातील त्याच्या भूमिकेचे कौतुकही करण्यात आलं होते.
“छिछोरे’ हा एक अत्यंत सकारात्मक चित्रपट होता. “आत्महत्येविरोधात युद्ध’ अशी त्याची थीम लाईन होती. अशा सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्यानेच आत्महत्या करणे हे खरंच धक्कादायक आहे. या चित्रपटात सुशांत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या मुलाला पुन्हा जीवनाचा अर्थ समजावून सांगतो.
त्यासाठी तो त्याला त्याची आणि त्याच्या 5 “लूझर’ मित्रांची कहाणी सांगतो. हे सर्व ऐकल्यावर अन्नीच्या मुलामध्ये जगण्याची इच्छा निर्माण होते. यातील “हम हार-जित, स्कसेस-फेल्युअर में इतना उलझ गये हैं की जिंदगी जिना भूल गये… जिंदगी में अगर कुछ सबसे ज्यादा इम्पॉर्टंट हैं तो वो हैं खुद जिंदगी’ हा डायलॉग खुपच गाजला होता. मात्र, खऱ्या आयुष्यात तो स्वत:ला नैराश्यातून बाहेर काढू शकला नाही. या चित्रपटाच्या तब्बल आठ महिन्यांनी सुशांतने स्वत: आम्तहत्या करणे अत्यंत धक्कादायक आहे.
चित्रपट
काय पो छे, शुद्ध देसी रोमान्स, पी.के., डिटेक्टिव ब्योमकेस बक्सी, एम.एस. धोनी ः द अनटोल्ड स्टोरी, रबता, चंदा मामा दूर के, केदारनाथ.
मालिका
किस देश में है मेरा दिल, पवित्र रिश्ता, जरा नचके दिखा, झलक दिखला जा-4.
इन्स्टाग्रामवर आईसाठी शेवटची भावनिक पोस्ट
“अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे आई’, असे लिहित सुशांतने भावनिक पोस्ट शेअर केली होती. सुशांत लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईसोबत सुशांत अनेक फोटो नेहमी शेअर करत असायचा.