पुणे -“पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचे संगीत, कॅमेरा आणि दिग्दर्शन महेश लिमये यांचे आणि त्यासोबत अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची जोडी हे कॉम्बिनेशन असलेला “जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट नवीन वर्षात 10 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येणार आहे.
पुनीत बालन निर्मित “जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटात नक्की कोणती जोडी असेल, याचा अंदाज प्रेक्षक बांधत होते. मात्र प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांची भन्नाट जोडी या चित्रपटात दिसणार आहे.
अमेय आणि वैदेही जावा बाईकवर बसले आहेत, वैदेही बेधडकपणे गाडी चालवत आहे आणि अमेय मागे गाडीवर उभा आहे. अंगात रंगीबेरंगी जॅकेट, गळ्यात सोन्याची साखळी आहे, ज्यावर ीळलह असे लिहिले आहे. तर वैदेही तिच्या लेदर जॅकेट, गॉगल आणि बिनधास्त स्माईलने सगळ्यांना घायाळ करत आहे. या जोडीचे फॅन आता पुन्हा एकदा हे दोघे काय धमाल करतात हे बघण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाचं कलरफुल मोशन पोस्टर, अमेय वाघचा नेहमीपेक्षा वेगळा असा अतरंगी लूक बघून चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार असतील हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
“पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील “मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ही लव्हस्टोरी 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांना पहायला मिळेल.