मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार शेवटचे कॅप्टन्सी कार्य “जो जिता वही सिकंदर”. काल बिग बॉस यांनी जाहीर केले पात्र सदस्यांसोबतच अपात्र सदस्यांना देखील उमेदावरी मिळत आहे.
बघूया आता शेवटचे कॅप्टनपद कोणाला मिळणार आणि कोण बनणार घराचा शेवटचा कॅप्टन… टास्क म्हंटल म्हणजे राडा, वादावादी ही होणारच. जय VS विशाल तर गायत्री VS मीरा बघायला मिळणार आहे. तर इतर सदस्य देखील एकमेकांच्या विरोधात खेळणारच. यामध्ये कोण विजयी ठरणार आज कळेलच.
टास्कमध्ये कोण कोणाच्या विरोधात खेळणार ? आणि कोण कोणाच्या बाजूने खेळणार ? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.