मुंबई – ताज डिव्हायडेड बाय ब्लडचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात नसीरुद्दीन शाह अकबरच्या भूमिकेत दिसत आहेत. त्याचबरोबर आशिम गुलाटी सलीमच्या भूमिकेत तर आदिती राव हैदरी अनारकलीच्या भूमिकेत आहे.प्रेम कथेसह वारसा हक्काची कहाणी सांगणारा हा ट्रेलर खूपच रंजक वाटत आहे.विशेष म्हणजे यात बऱ्याच दिवसांनी अभिनेते धर्मेंद्र यांचीही झलक पाहायला मिळते.
ट्रेलरमध्ये भरपूर रोमान्स, ड्रामा आणि अॅक्शन दिसून येत आहे. मुघल साम्राज्यावर आधारित ही वेब सीरिज लवकरच झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. मुघल साम्राज्याच्या इतिहासातील सलीम आणि अनारकलीची हिट प्रेमकहाणी यात पाहायला मिळणार आहे. मुघल साम्राज्यातील वारसा हक्कावरून कुटुंबात होणारे वाद आणि लढाई यावेळी उलगडणार आहे. या सीरिजचे 10 भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
या सिरीजनिमित्त बऱ्याच काळानंतर धर्मेंद्र पुन्हा एकदा स्क्रिनवर दिसले. ते अतिशय दमदार भूमिका साकारताना दिसत आहे. ट्रेलरमध्येही त्याची भूमिका दिसून येत आहे. त्याचबरोबर अनारकली बनलेल्या अदिती राव हैदरीची स्टाइलही चाहत्यांना चांगलीच भुरळ घालत आहे. तिच्या लुकचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.