मुंबई – प्रसिद्ध अभिनेते ‘शाहनवाज प्रधान’ यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होत. मात्र त्यांना खरी प्रसिद्ध ‘मिर्झापूर’ वेब सीरिज मधून मिळाली होती. यामध्ये त्यांनी ‘गुड्डू भैया’ (अली फजल) च्या सासऱ्याची भूमिका साकारली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 56 वर्षांचे शाहनवाज प्रधान हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते, तिथे त्यांनी वेदना होत असल्याची तक्रार केली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याचा सहकलाकार राजेश तैलंगने सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Shahnawaz bhai aakhiri salaam !!!
Kya gazab ke zaheen insaan aur kitne behatar adaakar the aap. Mirzapur ke dauran kitna sundar waqt guzara aapke saath, Yaqeen nahin ho raha 🙏#purushram #mirzapur pic.twitter.com/GviB4x53bj— Rajesh Tailang (@rajeshtailang) February 17, 2023
शाहनवाज यांनी आपल्या करिअरची सुरुवात दूरदर्शनच्या श्री कृष्णामध्ये नंदीची भूमिका साकारली केली होती. नंतर त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी इतर अनेक टीव्ही शो आणि चित्रपट केले. अलीकडे, मिर्झापूर 1 आणि मिर्झापूर 2 सह त्यांनी वेब स्पेसमधील रईस आणि खुदा हाफिज, फॅमिली मॅन सारख्या शोमध्ये देखील काम केले.