Subhedar : शिवराजाष्टक या चित्रपट मालिकेच्या माध्यमातून दिगपाल लांजेकर हा मराठी दिग्दर्शक छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपात व अतिशय अभ्यासू पद्धतीने मांडत आहे. याच अष्टकाच्या पाचव्या पुष्पाच्या म्हणजेच ‘सुभेदार’च्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर यांनी ऐतिहासिक चित्रपटांचं सादरीकरण कसं असावं उदाहरण आपल्यासमोर सादर केलं आहे.
दरम्यान, तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा असलेला ‘सुभेदार’ (Subhedar) हा चित्रपट आता शिवप्रेमींना घरबसल्या पाहता येणार आहे. येत्या 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ‘सुभेदार’ (Subhedar ) सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’ असं म्हणत तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याची मोहीम हाती घेतली होती. शत्रूंच्या 1500 सैन्यासमोर अवघे 500 मावळे हाताशी घेऊन तानाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढले. शूरवीर तानाजींचा हा झंझावात ‘सुभेदार’ सिनेमाच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवता येणार आहे.
या सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकार, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, शिवानी रांगोळे, नूपुर दैठणकर, भूषण शिवतरे, श्रीकांत प्रभाकर, बिपीन सुर्वे, अलका कुबल, राजदत्त, ऐश्वर्या शिधये,
सौमित्र पोटे, संकेत ओक, सुनील जाधव, मंदार परळीकर, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, दिग्विजय रोहिदास, रिषी सक्सेना, ज्ञानेश वाडेकर, मृण्मयी देशपांडे, दिग्पाल लांजेकर, आस्ताद काळे, पूर्णानंद वाडेकर आदि मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.