पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा 15 ते 18 जून दरम्यान

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षेच्या तारखा आज जाहीर केले आहे. त्यानुसार या परीक्षा 15 ते 18 जून या दरम्यान होत आहे.

विद्यापीठातील विविध विभागांमध्ये चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर आणि पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता प्रवेशपरीक्षा ऑनलाईनद्वारे होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. यापूर्वी अर्ज करण्याची मुदत 30 मेपर्यंत होती. दरम्यान, विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 3 जूपपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे अजूनही विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या आवारात सुरू असलेल्या पदव्युत्तर, पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची संधी आहे.

यापूर्वीच विद्यापीठाने प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. मात्र, त्यात प्रवेश परीक्षेच्या तारखा देण्यात आले नव्हते. आता विद्यापीठाने कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा कधी होणार आहे, किती वाजता आहे, त्याची तपशीलवार वेळापत्रक जाहीर केली आहे. या प्रवेश परीक्षा 15 ते 18 जून या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.