…अन् संतापलेल्या बच्चू कडूंनी स्वयंपाक्याच्या कानशिलात लगावली !

अकोला – अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू आपल्या ताबडतोड स्वभावामुळं महाराष्ट्रात परिचीत आहेत.  सर्वसामान्यांना होणाऱ्या अन्यायावर ते नेहमीच कणखर भूमिका घेताना दिसतात. यापूर्वी ते प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेल्याचं देखील घटना घडली आहे. अशीच काहीशी घटना घडली असून त्यांनी अकोल्यात स्वयंपाक्याच्या कानशिलात लगावल्याचं समोर आलं आहे.

कोरोना रूग्णांच्या जेवणासाठीच्या धान्यात मोठी अफरातफर झाल्याचं लक्षात आल्यावर कडू यांचा पार चढला आणि त्यांनी स्वयंपाक्याला मारहाण केली. बच्चू कडूंचा रुद्रावतार सोमवारी अकोल्यात पहायला मिळाला. बच्चू कडू यांनी जिल्हा रुग्णालयातील मेसला भेट दिलीय. यावेळी कडू यांना मेसमधील डाळीच्या दैनंदिन वापरात अपहार होत असल्याचं लक्षात आलं. त्यातूनच बच्चू कडू यांनी त्या स्वयंपाक्याच्या कानशिलात लगावली.

एका वृत्तपत्राने मेससंदर्भात दिलेल्या वृत्तानंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेसची पाहणी केली. यावेळी धान्यसाठ्याच्या पुरवठ्याची चौकशी केली असता आठ महिन्यांच्या धान्यसाठ्याची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून या प्रकरणाची चौकशी बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.