सातारा -जिल्ह्यात काल (दि. 24) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, आणखी 635 नागरिकांना करोनाची बाधा झाली असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी बुधवारी दिली. दरम्यान, जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवघे दोन करोनाबळी झाले. बाधित व मृतांची संख्या पुन्हा कमी आल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि त्यापुढे कंसात आजअखेरची बाधितांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – सातारा 140 (48578), फलटण 106 (34117), कोरेगाव 95 (20656), माण 86 (16534), कराड 80 (37474), खटाव 59 (23802), वाई 25 (15233), खंडाळा 12 (13720), जावळी 7 (9754), महाबळेश्वर 6 (4572), पाटण 6 (9888) व इतर 13 (1865), असे आजपर्यंत एकूण दोन लाख 36 हजार 193 करोनाबाधित आहेत.
गेल्या 24 तासांत मृत्यू पावलेल्या बाधितांची तालुकानिहाय संख्या आणि त्यापुढे कंसात आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – कराड 2 (1148), जावळी 0 (212), खंडाळा 0 (187), खटाव 0 (591), कोरेगाव 0 (448), माण 0 (373), महाबळेश्वर 0 (88), पाटण 0 (362), फलटण 0 (660), सातारा 0 (1426), वाई 0 (356) व इतर 0 (76), असे आजपर्यंत पाच हजार 927 करोनाबळी झाले आहेत.