नेवासा – पिकअप गाडी घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणावे या मागणीसाठी घोडेगांव (ता.नेवासा) येथील एका विविहितेला सासरच्या मंडळींकडून शारिरीक आणि मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा दाखल करण्यासाठी माहेरच्या व्यक्तींना बरीच कसरत करावी लागली. मयत व्यक्तीने आत्महत्या केली की,तीचा सासरच्या लोकांकडून खुन करण्यात आला याचा पोलीसांनी उलगडा करावा नंतरच विवाहीतेचा मृत्युदेह ताब्यात घेवू अशी भूमिका विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर अखेर नेवासा पोलीस ठाण्यात मृतक विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादूवरुन पती,सासू – सासरा,भाया अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर माहेरकडील नातेवाईकांनी विवाहितेचा मृत्युदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.
ही घटना रविवार (दि.२८) रोजी दुपारी तीन वाजता घडली.घोडेगांव (ता.नेवासा) येथील विवाहिता मोनिका रामकृष्ण पटारे हिचा विवाह घोडेगांव येथील रामकृष्ण शिवाजी पटारे याच्या बरोबर ११ वर्षांपुर्वी झालेला होता लग्नानंतर ७ वर्ष विवाहितेला चांगले नांदविले गेले होते या विवाहितेला २ मुली एक मुलगा असे अपत्य आहेत.
मयत विवाहितेच्या पतीने सोमवार (दि.२२) जानेवारी रोजी रात्री ११ वाजता विवाहितेच्या वडीलांना फोन करुन सांगितले होते की,मोनिका आणि माझे भांडणे झालेले असून ती जेवन करत नाही. त्यानंतर स्वतः पतीने विवाहितेची सोनई पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दिली. त्यानंतर विवाहितेचा मृत्युदेह घोडेगांवच्या पाटात आढळून आला.
माझ्या मुलीचा पिकअप गाडी आणण्यासाठी छळ केला जात होता त्यामुळे माझ्या मुलीचा सासरच्या लोकांनी घात केल्याचा संशय विवाहितेच्या वडिलांनी पोलीसांकडे व्यक्त केला. याप्रकरणी विवाहितेचे वडील राजेंद्र मारुती वालतुरे रा.घुमनदेव (ता.श्रीरामपूर) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर विवाहितेचा पती रामकृष्ण शिवाजी पटारे, सासरा शिवाजी देवराव पटारे,सासू शांताबाई शिवाजी पटारे,भाया अनिल शिवाजी पटारे या चौघांवर नेवासा पोलीस ठाण्यात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.