महाळुंगे इंगळे- काच बसविण्याचे कंत्राट घेवूनही नाणेकरवाडी (ता. खेड) येथील भवानी इंडस्ट्रीज या कंपनीत विविध ठिकाणी काच न बसविता कंपनीला चक्क साडेपाच लाख रुपयांना चुना लावला आहे. याप्रकरणीमहाळुंगे इंगळे पोलिसांनी वारजे (पुणे) येथील तील एका कंत्राटदाराविरुद्ध शनिवारी (दि. 28) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत भाऊराव ठाकूर (रा. वारजे, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. तर गणेश मदनलाल गोलेचा (वय 31, रा. चाकण, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे महाळुंगे इंगळे पोलीस पुढील तपास करीत आहेत.