प्रशासनाकडून पाहणी : घरावरील पत्रे उडाली, होर्डिंग पडले
गराडे – पुरंदर तालुक्याच्या पशिम भागातील घिसरेवाडी, भिवरी, बोपगाव परिसराला रविवारी (दि. 19) सायंकाळी 6 वाजता वादळी वार्यासह पावसाचा चांगलाच तडाखा बसला. या वादळात घिसरेवाडी, बोपगाव या गावातील घरे तसेच गुरांच्या गोठ्यांचे पत्रे एमएसीबीचे खांब व होर्डिंग पडले तरी पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दरम्यान, या नुकसानग्रस्त परिसराची तहसीलदार विक्रम राजपूत यांनी पाहणी केली.
या वादळाचा तडाखा गराडे, घिसरेवाडी, भिवरी, चांबळी, हिवरे, बोपगाव, कोडीत परिसराला बसला. एक तास वादळी वार्यासह झालेल्या पावसाने भात खाचरे पाण्याने भरली होती. भिवरी, घिसरेवाडी येथील जगन्नाथ देवराम कटके यांच्या घराचे पत्रे उडून मोठा आवाज झाला. त्यामुळे घिसरेवाडी, भिवरी येथील घरांचे पत्रे उडून गेले. भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वादळी वार्यात घिसरेवाडी येथील घरांचे नुकसान झाले आहे. वार्याचा वेग एवढा प्रचंड होता की, जनावरांच्या चार्याच्या गंजी उडायला सुरुवात झाली होती. काही ठिकाणी मोठी झाडे कोसळल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
भिवरीजवळ चांबळी येथे वादळात अनेक ठिकाणी बाभळीचे झाड रस्त्यावर पडले तसेच घर व गोठ्याचे मोठे नुकसान झाले. विजेच्या पडझडी झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित विद्युत खांब व तारा तुटल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचार्यांनी काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. तहसीलदार विक्रम राजपूत यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. भिवडीचे मंडलाधिकारी सचिन मोरे, तलाठी कल्पेश कटारे, सुजित मंडलेचा, हमीद शेख, धनराज बाठे आदी उपस्थित होते