पुणे- गेल्या काही महिन्यांत सातत्याने मागणी केल्यानंतर अखेर पुणे-नांदेड आणि पनवेल-नांदेड एक्स्प्रेसचे डबे अखेर वाढवण्यात आले आहेत. याबाबत दक्ष्िण मध्य रेल्वे विभागाने घोषणा केली आहे. या दोन्ही एक्स्प्रेसला पूर्वी आयसीएफ पद्धतीचे कोच होते. त्यावेळी या दोन्ही ट्रेन्स २३ डब्यांच्या होत्या. नंतर या गाड्यांना पूर्ण डबे एलएचबी पद्धतीचे जोडण्यात आले. यादरम्यान या दोन्ही ट्रेन्सना फक्त १५ डबे जोडण्यात आले. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झाले.
दिवाळीसह उन्हाळी सुट्या आणि गौरी-गणपती काळात मागणी करूनही या दोन्ही ट्रेन अपूर्ण डब्यांसह धावत होत्या. मध्य आणि दक्ष्िण मध्य या रेल्वेच्या दोन्ही विभागांत समन्वय नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला आहे. अखेर आता दिवाळी सुट्या संपल्यानंतर का होइना, पण या दोन्ही एक्स्प्रेस ट्रेन्सना प्रत्येकी दोन डबे वाढवण्यात आले आहेत. पनवेल आणि पुण्यातून दि. ४ डिसेंबरपासून सुटणाऱ्या या ट्रेन्स आता जादा डब्यांसह धावतील.
असे आहे नवीन नियोजन
- ट्रेन क्रमांक 17630 /17629 नांदेड – पुणे – नांदेड एक्स्प्रेस
- ट्रेन क्रमांक 17614 /17613 नांदेड- पनवेल- नांदेड एक्स्प्रेसला एक तृतीय श्रेणी वातानुकूलित आणि एक स्लीपर क्लास डबे जोडले जाणार.