मुंबई – तापसी पन्नू सध्या “पसीन दिलरुबा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 2 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरवरूनच यात तापसीचे किती हॉट सीन आहेत, याची कल्पना येऊ शकते.
“हसीन दिलरुबा’मध्ये तापसीने विक्रांत मेसी आणि हर्षवर्धन राणेबरोबर इंटिमेट सीन दिले आहेत. हे दोघेही आपल्याबरोबर इंटिमेट सीन करण्यासाठी खूपच घाबरलेले होते, असे तापसीने म्हटले आहे.
यापूर्वी “थप्पड’ आणि “पिंक’ या सिनेमांमधून तापसीने स्वतःची स्वतंत्र प्रतिमा बनवलेली आहे. याशिवाय “नाम शबाना’मधील तिची इमाज अगदीच हटके होती.
याशिवाय सेटवर ती सततच दिग्दर्शकाची तक्रार करत असते. यामुळे हे दोघेही कलाकार तिला अगदी टरकून असायचे. आपण या दोघांनाही या सीनसाठी खूप स्वाभाविक वातावरण निर्माण केले होते, असे तापसीने सांगितले.
आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या पार्टनरशीही आपण एवढी चर्चा करत नाही. केवळ सिनेमाच्या सीनसाठी आपण हे सहकार्य केल्याचे तिने सांगितले.
आपल्या सिनेमामध्ये अशाप्रकारचा कोणताही इंटिमेट सीन आहे की नाही याबाबत हर्षवर्धन आणि विक्रांत हे दोघेही अगोदर माहिती करून घेत असतात. तरीही ते एवढे घाबरले होते, हे विशेष.