पुणे – गेले काही दिवसांपासून शहरात असणारा पावसाचा जोर मंगळवारी काहीसा कमी झाला होता. दुपारनंतर शहरात पावसाने उघडीप दिली होती.
मंगळवारी सकाळी पावसाच्या काही सरी झाल्या, त्यानंतर अधूनमधून एखादी सर येत होती. सायंकाळनंतर पावसाने पूर्ण उघडीप दिली. पुढील चोवीस तासांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी होण्याची शक्यता आहे.