जनतेच्या आशा, आकांक्षांना पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प- पंतप्रधन नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – ‘मोदी-2′ सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (५ जुलै) लोकसभेमध्ये सादर केला. दरम्यान, या बद्दल देशाचे पंतप्रधान “नरेंद्र मोदी” यांनी आपले मत मांडले आहे.

आज देशातील नागरिकांचा आत्मविश्वास वाढला असून या सरकारकडून मोठ्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आज जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जनतेच्या या आशा, आकांक्षांना पूर्ण करण्यासाठीच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.

योग्य दिशा आहे, गतीही योग्य आहे आणि त्यामुळे योग्य लक्ष्यावर पोहोचायचे आहे, असा विश्वास या बजेटमधून मिळत आहे. या अर्थसंकल्पात गरीब, शोषित, वंचित, दलित पीडित, शेतकरी, शेतमजूर, तरुण आणि महिलावर्गांच्या सशक्तीकरणासाठी विशेष पावले उचलण्यात आले आहेत. हा अर्थसंकल्प देशाला खऱ्या अर्थाने “पॉवरहाऊस’ बनविणारा आहे.

21व्या शतकातील भारताचे स्वप्न पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. 2022मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून सरकारने काही संकल्प मांडले आहेत. या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पातून मार्ग मिळेल.
– पंतप्रधन नरेंद्र मोदी

Leave A Reply

Your email address will not be published.