शिर्डी, (प्रतिनिधी } शहरात बुधवारी रात्री नांदुर्खी रोडवर झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळून दुचाकी वरील साहिल सुदाम गोंदकर (वय २५) या तरुणाला डोक्याला जबर मार लागल्याने व अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला त पाठीमागे बसलेला सत्यम कुहीले (वय २५) हा जबर जखमी झाला आहे.
अपघात होताच नागरिकांनी दोघांना तत्काळ लगतच्या शिर्डी शहरातील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या सत्यम कुहिले यास पोटाला, डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मयत साहील गोंदकर हा शिर्डी येथील हॉटेल व्यावसायिक व इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रेते सुदाम चांगदेव गोंदकर यांचा मुलगा असून वसंत गोंदकर याचा तो पुतण्या आहे. या रोडवर या अगोदर देखील अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. या अपघातामुळे गोदकर कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.