Ali Merchant: सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकत आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यानंतर आता आणखी एका टीव्ही अभिनेत्याने विवाह केला आहे. या अभिनेत्याचे नाव आहे अली मर्चंट. ‘लॉक अप’ आणि ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता. विशेष म्हणजे अली तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. 2 नोव्हेंबर रोजी अलीने अंदलीब जैदीशी लग्न केले आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कुटूंबाच्या उपस्थित त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. अलीच्या पहिल्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली होती. सलमान खानचा शो ‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनमध्ये अलीने टीव्ही अभिनेत्री सारा खासनसोबत नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न केलं होतं. बिग बॉसच्या घरात त्यांनी लग्न केले होते.
मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. 2011 मध्ये सारा खासन आणि अली मर्चंट यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर अलीने 2016 मध्ये अनमशी लग्न केले. मात्र त्यांचे नाते टिकू शकले नाही. त्यानंतर आता अलीने तिसऱ्यांदा विवाह करण्याचा निर्णय घेतला.
मर्चंट गेल्या वर्षभरापासून अंदलीब जैदला डेट करतो आहे. दोघांनी पहिली भेट एका फॅशन शोवेळी झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले आणि अखेर ते विवाह बंधनात अडकले. अली मर्चंटची पत्नी अंदलीब जैदी व्यवसायाने मॉडेल आहे. लखनऊमध्ये विवाह झाल्यानंतर आता 15 नोव्हेंबर रोजी त्यांचे मुंबईत रिसेप्शन होणार आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.