मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी स्वीकारला पदभार
नगर – शहरातील विकास कामांना गती देण्यासाठी सत्ताधारी व प्रशासनाला धारेवर धरणार आहे. शहरात सुरू असलेल्या कामे अंदाजपत्रकानुसार व्हावी यासाठी प्रशासन व सत्ताधारी यांचेलक्ष वेधणार असून कामांचा दर्जा तपासला जाणार असल्याचे विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर यांनी सांगितले.
मनपाच्या विरोधीपक्ष नेतेपदाचा पदभार संपत बारस्कर यांनी स्वीकारला यावेळी ते बोलत होते. यावेळी संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, सभागृह नेते स्वप्निल शिंदे, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती लता शेळके, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, गणेश भोसले, कुमार वाकळे, मीना चव्हाण, संजय चोपडा, रवींद्र बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, सागर बोरूडे, शिवाजी चव्हाण, अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, अमोल गाडे, सुनिल त्रिंबके, अजिंक्य बोरकर, सचिन जाधव, मनोज कोतकर, नितीन बारस्कर, सचिन बारस्कर आदीसंह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संपत बारस्कर म्हणाले की, विरोधीपक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडणार आहे. प्रभाग क्र. 7 मधील बोल्हेगांव फाटा ते गणेश चौक या रस्त्याचे कॉक्रीटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून या कामाची जिल्हाधिकारी तथा राहुल द्विवेदी यांचेकडे त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.
या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे रस्त्यावरील सिमेंटची धुळ तयार होत आहे.