दहावीच्या मूळ गुणपत्रिका शुक्रवारी शाळेत मिळणार

पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाच्या मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि.21) शाळांमध्ये मिळणार आहे.

राज्यात 1 ते 22 मार्च या कालावधीत दहावीच्या परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल 8 जून रोजी लावण्यात आला आहे. आता राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळाना निकालाच्या मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना वाटप करण्याबाबतच्या सूचना नुकत्याच दिल्या आहेत.

विभागीय मंडळामार्फत सकाळी 11 वाजता मूळ गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख यांचे वाटप शाळांच्या प्रतिनिधींना करण्यात येणार आहे. यासाठी तालुकानिहाय वाटप केंद्रांची व्यवस्थाही विभागीय मंडळामार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वा. शाळांनी गुणपत्रिकांचे वाटप करण्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.