मुंबई – साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या दमदार अभिनय आणि स्टाइलमुळे तो अधिक ओळखला जातो. विजयचे चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून विजय त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. विजयचा ‘लिओ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटासाठी खुपच उत्सूक आहेत. मात्र प्रदर्शनापूर्वीच यूकेमध्ये या चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे.
येत्या 19 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र रिलीजच्या 42 दिवस आधीच दहा हजार तिकिटे बुक करण्याचा विक्रम या चित्रपटाने केला आहे. अहिंसा एंटरटेनमेंटने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एजन्सीने एक्स (ट्विटर)वर पोस्ट करत लिहिले, “वाह! आम्ही स्टेज सेट केला आहे. पण तुम्ही शो चोरला! 24 तासांत 10 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली. त्याची विक्री 100 हजार पौंडच्या पुढे गेली.. हे मास वाटत आहे? UK मध्ये LEO साठी तुम्ही दाखवलेलं प्रेमाने आमचा आनंद वाढवला आहे. 19 ऑक्टोबर हा आमचा थलापथी साजरी करण्याचा दिवस आहे. तो संस्मरणीय बनवूया!”
WHOA! We set the stage, but you stole the show! Over 10k tickets sold in under 24 hours, crossing £100k in sales.. feeling the MASS? 🙌
The love you’ve shown for #LEO in UK has left us speechless. Oct 19 is our day to celebrate #Thalapathy. Let’s make it unforgettable! ❤️🥺 pic.twitter.com/so9T6rGvTr
— Ahimsa Entertainment (@ahimsafilms) September 8, 2023
दरम्यान, या चित्रपटात विजय व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्तची व्यक्तिरेखा खलनायकाची असणार असल्याचे मानले जात आहे. या दोन स्टार्सशिवाय प्रिया आनंद, तृष्णा कृष्णन आणि अर्जुन सर्जा हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. थलपथी विजय आणि तृष्णा कृष्णन 14 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. खूप दिवसांनी दोघांना पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांसाठी खूप रोमांचक असणार आहे.