लंडन – आधुनिक काळात मोबाईल वापराची सवय सर्वांनाच लागली असून त्याचे व्यसनातही रूपांतर होऊ लागले आहे याच पार्श्वभूमीवर इंग्लंडमधील एका योगर्ट कंपनीने डिजिटल डीटॉक्स योजना आखली असून एक महिनाभर मोबाईलपासून दूर राहिलेल्याना दहा हजार डॉलरचे बक्षीस देण्यात येणार आहे.
सिगीज डेअरी असे या योगर्ट कंपनीचे नाव असून या कंपनीची सर्व दुग्धोत्पादने लोकप्रिय आहेत लोकांनी नैसर्गिक जीवन जगावे आणि मोबाईल सारख्या घातक उपकारणापासून दूर राहावे याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी या कंपनीने ही योजना आखली आहे 31 जानेवारी पर्यंत कोणीही या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो एक महिनाभर मोबाईलचा अजिबात वापर न करणाऱ्यांना दहा हजार डॉलरचे बक्षीस देण्यात येणार आहे शिवायया कंपनीच्या प्रख्यात योगर्टचा तीन महिन्यांचा पुरवठाही संबंधित लोकांना करण्यात येणार आहे.
डिजिटल डिटॉक्स असे या योजनेला नाव देण्यात आले असून 31 जानेवारीपर्यंत अर्ज करणाऱ्यांपैकी दहा लोकांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे ज्या दहा लोकांची निवड करण्यात येईल त्यांना त्यांचे सर्व मोबाईल फोन एका बॉक्समध्ये बंद करून ठेवावे लागणार आहेत हे बॉक्स सुद्धा ही योगट कंपनी पुरवणार आहे एक महिना झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार असून त्यामध्ये यशस्वीपणे स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे दहा हजार डॉलर योगर्ट उत्पादन आणि एक जुन्या पद्धतीचा मोबाईल फोनही देण्यात येणार आहे.
या कंपनीने केलेल्या सर्व्हे प्रमाणे सर्वसाधारण नागरिक दररोज किमान साडे पाच तास आपल्या मोबाईलवर खर्च करतो यामुळे वेळेचा जो अपव्य होतो तो टाळण्यासाठी डिजिटल डिटॉक्स सारखी योजना गरजेची आहे असे या कंपनीचे म्हणणे आहे कंपनीच्या या योजनेला आतापर्यंत अनेकांनी प्रतिसाद दिला असून त्यापैकी किती जणांची निवड या स्पर्धेसाठी होते ते 31 जानेवारी नंतर कळणार आहे.