पुणे – दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागात तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
20 ते 28 जानेवारीदरम्यान हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस, एलटीटी ते हुबळी एक्स्प्रेस, 23 जानेवारी रोजी बेंगळुरु-गांधीधाम एक्स्प्रेस, जोधपूर-बेंगळुरु एक्स्प्रेस, 24 जानेवारी रोजी अजमेर-मैसुरू एक्स्प्रेस, 25 जानेवारी रोजी बेंगळुरु-जोधपूर एक्स्प्रेस, 26 जानेवारी रोजी गांधीधाम-बेंगळुरु एक्स्प्रेस, मैसुरू-अजमेर एक्स्प्रेस, 22 आणि 27 जानेवारी रोजी हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर एक्स्प्रेस, 26 आणि 28 जानेवारी रोजी धावणारी यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.