Team India’s Diwali Celebrations in Bangalore – एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील नेदरलॅंड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी संपूर्ण भारतीय संघाने रविवारी आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी केली.
पारंपरिक वेशभुषा करत संघातील कर्णधार रोहित शर्मासह सर्व खेळाडूंनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून 19 नोव्हेंबरला एक भेटही देणार आहोत, असे वचनही दिले.
नेदरलॅंड्सविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाने दिवाळी प्रचंड जल्लोषात साजरी केली. बंगळुरूमध्येच ही खास दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीचा व्हिडीओ 👇👇 👇👇 बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
We are #TeamIndia 🇮🇳 and we wish you and your loved ones a very Happy Diwali 🪔 pic.twitter.com/5oreVRDLAX
— BCCI (@BCCI) November 12, 2023
या पार्टीत भारतीय संघ पत्नी आणि मुलांसह उपस्थित होते. सगळ्यांनीच चक्क आपल्या कुटुंबासह गाणी गायली, नृत्य केले व धमाल करत हा सोहळा साजरा केला.