TCS fourth quarter results declared – आयीटी कंपनी टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (TCS) ने आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे Q4FY24 चे निकाल जाहीर केले आहेत. वार्षिक आधारावर जानेवारी-मार्च तिमाहीत TCS चा निव्वळ नफा 9% ने वाढून ₹12,434 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत (Q4FY23) कंपनीचा निव्वळ नफा ₹11,392 कोटी होता. तर Q3FY24 मध्ये म्हणजे तिसऱ्या तिमाहीत, TCS चा निव्वळ नफा ₹ 11,058 कोटी होता.
कंपनी प्रति शेअर 28 रुपये अंतिम लाभांश देणार –
निकाल जाहीर करण्याबरोबरच, TCS ने प्रति शेअर 28 रुपये अंतिम लाभांश देखील जाहीर केला आहे. TCS चा एकत्रित महसूल चौथ्या तिमाहीत 3.5% ने वाढून ₹61,237 कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ₹59,162 कोटी होता.
कर्मचारी कपात –
चौथ्या तिमाहीत TCS मध्ये 1759 कर्मचाऱ्यांची घट झाली आहे. यापूर्वी, तिसऱ्या तिमाहीत 5,680 आणि दुसऱ्या तिमाहीत 6,333 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. 31 मार्चपर्यंत कंपनीत एकूण 6,01,546 कर्मचारी आहेत.
TCS समभाग 0.48% वाढून 4,003 रुपयांवर –
12 एप्रिल रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे समभाग 0.48% वाढीसह 4,003.80 रुपयांवर बंद झाले. सध्या TCS चे मार्केट कॅप 14.50 लाख कोटी रुपये झाले आहे.