टाटा समूह भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी तैवानच्या पुरवठादाराशी चर्चा करत आहे. हा समूह दक्षिण आशियाई देशात आयफोन असेंबल करण्याचा प्रयत्न करत आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली तर टाटा आयफोन बनवेल आणि आयफोन बनवणआरी टाटा ही पहिली भारतीय कंपनी बनेल. तसेच टाटा समुहाने आयफोन बनविल्यास त्याचे उत्पादन भारताही होईल. आणि त्यामुळे आयफोनच्या किंमतीतही घट होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विस्ट्रॉन कॉर्पशी झालेल्या चर्चेचा उद्देश टाटाला तंत्रज्ञान निर्मितीत एक शक्ती बनवण्याचा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की सॉल्ट-टू-सॉफ्टवेअर समूह (टाटा समूह) उत्पादन विकास, पुरवठा साखळी आणि असेंब्लीमध्ये तैवानच्या कंपनीच्या कौशल्याचा वापर करण्याचा विचार करत आहे, एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
सध्या प्रामुख्याने चीन आणि भारतात विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप सारख्या कंपन्या अॅपल फोन असेंबल करतात. टाटाने आयफोनचे उत्पादन सुरू केल्यास चीनला मोठा धक्का बसेल.
कोविड लॉकडाऊन आणि अमेरिकेसोबतच्या राजकीय तणावामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात चीनचे वर्चस्व धोक्यात आले आहे. वाढत्या भू-राजकीय जोखमीच्या वेळी चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी इतर जागतिक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सना भारतात असेंबल करण्याचा विचार करण्यासाठी हे पाऊल प्रोत्साहन देऊ शकते.
एका योजनेअंतर्गत, टाटा विस्ट्रॉनच्या इंडिया ऑपरेशन्समध्ये इक्विटी खरेदी करू शकते किंवा कंपनी नवीन असेंबली प्लांट बांधू शकते. यासह, हे दोन्ही सौदे देखील होऊ शकतात. म्हणजे कोणतीही शक्यता नाकारता येत नाही.
टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, इलेक्ट्रॉनिक्स आणि हाय-टेक उत्पादन हे कंपनीसाठी मुख्य फोकस क्षेत्र आहेत. विस्ट्रॉन इंडियाला तोटा सहन करावा लागत आहे आणि या निर्णयामुळे त्याचा फायदा होऊ शकतो.