पुणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची आकर्षक सजावट आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागरात आज पुणेकर न्हाऊन निघाले आहेत. अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा रंगला. मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू झाली. दरम्यान, मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन झाल्यानंतरच इतर मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यातच आता पुण्यातील मानाच्या पहिल्या कसाब गणपतीचे विसर्जन झाले आहे.
दरम्यान, मानच्या पहिल्या कसबा गणपतीचे ४ वाजून १८ मिनिटांनी विसर्जन झाले. दरम्यान, गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक पाहायला मिळाले.
शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर कसबा गणपती आल्यानंतर इथे बेलगाम चौकात मुस्लिम बांधवांनी कसबा गणपतीच्या पालखीचे सारथ्य केले. तसेच लहान मुलांसाठी लाठी-काठी आणि तलवार बाजी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. दरम्यान, दोन वर्षाच्या करोना काळानंतर निर्बंधमुक्त उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.