बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारियाने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. तारा सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
View this post on Instagram
तारा सुतारियाने “स्टूडेंट ऑफ द इयर-2′ या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीजमध्ये पाउल ठेवले होते. यात तिच्यासोबत टायर श्रॉफने मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडेनेही डेब्यू केले होते.
View this post on Instagram
ताराने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी टेलिव्हिजनवर काम केलेले होते. आतापर्यत ती दोन चित्रपटात झळकलेली आहे. “स्टुडेंट ऑफ द इयर’नंतर तिने “मरजावा’ चित्रपटात एका मुक मुलीची भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
नुकतेच तिने समुद्र किनारी केलेला फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव केला आहे. ताराला तिच्या समुद्रकिनारी केलेल्या फोटोशूटमुळे तिच्या ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत.
View this post on Instagram
तिच्या वर्कफ्रंट बाबत सांगायचं झाल्यास तारा ही “तडप’ आणि “एक व्हिलेन-2’च्या कामात व्यस्त आहे. “तडप’ हा “आरएक्स 100′ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. याचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करत आहे. या चित्रपटातून सुनील शेट्टीचा मुलगा अहान हा बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तर “एक व्हिलेन-2’मध्ये तारासोबत जॉन अब्राहम, दिशा पाटणी आणि आदित्य रॉय कपूर आदी काम करत आहेत.