सुपरस्टार विजयची थेट आई-वडिलांविरोधात तक्रार; म्हणाला माझ्या नावाचा…

नवी दिल्ली – साऊथचा सुपरस्टार असलेल्या अभिनेत्याने थेट आई-वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

आपल्या नावाने राजकीय पक्षाची स्थापना केल्याचा आरोप अभिनेता थलपती विजय याने केला आहे. विजयच्या आईचं नाव शोभा असं असून वडिलांचं नाव एसए चंद्रशेखर आहे. विजयचे वडील चंद्रशेखर यांनी त्याला राजकारणात सहभागी होण्याचा सल्ला दिला होता. पण, तेवढ्यावरच न थांबता त्यांनी विजयच्या नावाने एका राजकीय पक्षाची स्थापनाही केली.

विजयच्या वडिलांनी नातेवाईक असलेल्या पद्मनाभन नावाच्या व्यक्तिला पक्षाचा अध्यक्ष बनवलं तर पत्नीला खजिनदार म्हणून घोषित केलं. स्वतः चंद्रशेखर यांनी कार्यवाह पदाचा भार स्वीकारण्याचं ठरवलं.

दरम्यान या प्रकारानंतर विजयने जाहीर निवेदन प्रसिद्ध केलं. आपण कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी सहमती दर्सविलेली नाही. तसेच विजयने आई वडिलांसह अन्य 11 जणांविरोधात तक्रारही दाखल केली आहे. यानुसार विजयच्या नावाचा वापर करून कोणताही राजकीय फायदा उचलण्याला प्रतिबंध होऊ शकेल, असं त्याचं म्हणणं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.