तामिळनाडू – शनिवारी (दि. 19) सकाळी तामिळनाडूच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आले. सकाळी कडक सुरक्षा आणि करोना नियमांचे पालन करून हे मतदान सुरूकरण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3 वाजेपर्यंत 47 टक्के मतदान झाले होते. तर, संध्याकाळी 5 वाजता मतदान संपेपर्यंत 52% पर्यंत मतदान झाले होते.
दरम्यान, या मतदान प्रक्रियेत मात्र साऊथ सुपरस्टार ‘रजनीकांत, अजित कुमार, धनुष, सिम्बू, शिवकार्तिकेयन आणि त्रिशा’ या सारख्या अनेक मेगा स्टारने आपला मतदानाचा हक्क बजवला नाही. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी मतदान केंद्राबाहेर थांबलेल्या त्यांच्या चाहत्यांची मोठी निराशा
झाली आहे. तसेच, मेगा सिलिब्रिटींनी लोकशाहीच्या मतदान प्रक्रियेत आपले योगदान न दिल्यामुळे आता सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा ट्विटर आणि फेसबुकवर आपले मत मांडण्यास सुरुवात केली आहे.