वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीसाठी रविवारी (दि.25) मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीसाठी 77.80 टक्के मतदान झाले. मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना (शिंदे गट) या महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय झाला असून निवडणुकीआधीच महायुतीच्या दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात होते.
खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून एकूण 19 जागांपैकी अ वर्गातील 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर ब वर्गातील 2. महिला प्रतिनिधी 2 व भटक्या विमुक्त जाती गटातील 1 अशा एकूण 10 जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 9 जागांसाठी रविवारी (दि.25) मतदान प्रक्रिया पार पडली.
मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे- विजयी उमेदवार -अनुसूचित जाती जमाती- मधुकर जगताप 894, क वर्ग -किरण हुलावळे 818, माणिक गाडे 805, गणेश विनोदे 743. इतर मागास प्रवर्ग -अमोल भोईरकर 508. अ वर्ग – टाकवे गट: शिवाजी असवले, शिवली गट : विष्णू घरदाळे 4, खडकाळा – रमेश भुरुक 4, वडगाव : एकनाथ येवले 4.
बिनविरोध विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
तळेगाव- रुपेश घोजगे, साळुंब्रे बाजीराव वाजे, लोणावळा : भरत येवले, कोथूर्णे: ज्ञानेश्वर निंबळे, आंबेगाव : शहाजी कडू. ब वर्ग- प्रमोद दळवी, आशा मारुती खांडभोर महिला प्रतिनिधी : मनीषा आंबेकर, सुनीता केदारी. भटक्या विमुक्त जाती शरद नखाते.