तळेगाव दाभाडे,(वार्ताहर) – प्रगती विद्या मंदिराचे विद्यार्थ्यांचा शासकीय रेखाकला (चित्रकला) एलिमेंटरी ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये निकाल १०० टक्के लागला. यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव, प्रगती विद्या मंदिराचे पालक संतोष खांडगे, शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, प्राचार्य कैलास पारधी, पर्यवेक्षक राजेंद्र वाजे, शिक्षक प्रतिनिधी मोहिनी ढोरे, शिक्षकेतर प्रतिनिधी गुलाब ढोरे सर्व शिक्षक वृंद, यांनी केले. तर यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक अमोल जाधव यांनी मार्गदर्शन केले. रुपेश शिंदे, संतोष कदम, अलका आडकर, शीतल शेटे, विनोद भोसले, सुमती शिंदे यांनी सहकार्य केले.
एलिमेंटरी ग्रेड उतीर्ण परीक्षा निकाल -१००% – प्रविष्ठ विद्यार्थी-७४, A श्रेणी-०१, B श्रेणी -३३, C श्रेणी-४० इंटरमिजिएट ग्रेड उतीर्ण परीक्षा निकाल – १००% – प्रविष्ठ विद्यार्थी-३५, A श्रेणी-०२, B श्रेणी-१५, C श्रेणी-१८