“खासदारांचे वेतन घ्या मात्र…” – नवनीत राणा

नवी दिल्ली – लोकसभेमध्ये आज संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (दुरुस्ती) विधेयक 2020 मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार आता पुढील वर्षभरासाठी खासदारांचे 30 टक्के वेतनावर कात्री फिरणार आहे. अशातच महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभेमध्ये बोलताना आज, मतदारसंघ विकास निधीमध्ये कपात न करण्याची विनंती केली.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “आवश्यक असल्यास खासदारांचे वेतन घ्या, मात्र मतदारसंघाच्या विकासासाठी खासदारांना देण्यात येणार मतदासंघ विकास निधी कापू नका.” अशी विनंती खासदार राणा यांनी केली.


दरम्यान, कोरोना काळात संसदेचे ऐतिहासिक अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले आहे. राज्यसभा सकाळी 9 ते 1 आणि लोकसभा दुपारी 3 ते 7 अशा दोन सत्रांमध्ये हे कामकाज सुरु आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन सभागृहे वापरली जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.