T20 WorldCup – नामिबिया आणि यूएई यांच्यात खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीतील सामन्यात रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. सामन्यात दोन्ही संघांनी शेवटपर्यंत झुंज दिली मात्र, यूएई संघाने नामिबियाला ७ धावांनी पराभूत करण्यात यश मिळवले. नामिबिया संघाला या सामन्यात विजय मिळवून सुपर-१२ मध्ये स्थान मिळवण्याची संधी होत. आता हे दोन्हीही संघ टी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यूएईने २० षटकात ३ गडी बाद १४८ धावा केल्या होत्या.
विराट कोहलीसोबत फोटो काढला अन काही वेळातच सोशल मीडियावर बनली स्टार
प्रत्युत्तरात नामिबिया संघाला ८ विकेट गमावून निर्धारित षटकात १४१ धवांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे त्यांना हा सामना ७ धावांनी गमवावा लागला. नामिबियाने याअगोदर श्रीलंकेचा पराभव केला होता, त्यामुळे हा सामना जिंकल्यास ते सुपर-१२ साठी पात्र ठरले असते. मात्र आता नेदरलँड्सने अ गटातून सुपर-१२ मध्ये स्थान मिळवले आहे. त्यांना भारत आणि पाकिस्तान संघांचा समावेश असलेल्या सुपर-१२ च्या गट-२ मध्ये प्रवेश मिळाला आहे.
विश्वचषकातील ( T20 WorldCup ) अनेक सामन्यांवर पावसाचे सावट
गुरुवारी रात्री मेलबर्नमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हवामान अंदाजानुसार पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. Accuweather ला मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या तीन राज्यांमध्ये जोराचा पाऊस पडू शकतो. २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत ९६ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर २३ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सध्या तरी भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट मानले जात आहे.
Heartbreak for Namibia 💔
UAE hold their nerve under pressure and Netherlands, at the expense of Namibia, are through to the Super 12 stage 😮#NAMvUAE | #T20WorldCup | 📝: https://t.co/S0acuVG7iv pic.twitter.com/fdQEQb4wZ2
— ICC (@ICC) October 20, 2022