स्वरा भास्करचे दिल्लीत शूटिंग

जगासह देशात करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर बॉलीवूडमधील कामकाजही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाउनमध्ये रखडलेल्या अनेक चित्रपटांचे शूटिंग आता सुरू होत असून अभिनेत्री स्वरा भास्कर देखील पुन्हा सक्रिय झाली आहे.

दिर्घकाळानंतर ती पुन्हा कॅमेऱ्यासमोर जात असल्याने उत्साहित आहे. स्वराने नुकतेच दिल्लीत एका मॅग्झीन कव्हरसाठी शूट केले आहे. यावेळी स्वरा ही सेटवर मास्क, ग्लव्ससह सोशल डिस्टेंसिंगचे पालन करताना दिसली. कॅमेऱ्यासमोर जाताना तिने मास्क काढत शूटिंग सुरू केले.

स्वरा म्हणाली, माझयासाठी हा अनुभव खूपच अद्‌भत असा आहे. दिर्घकाळानंतर कॅम-यासमोर उभे राहताना खूप समाधान वाटले. या क्षणांना मी खूप मिस करत होते. मी सलग दोन दिवस 7 तास शूटिंग केले. याप्रसंगी सेटवर एकाच वेळी बाराहून अधिक लोक नव्हते. यात माझे व्यक्‍तिगत 3 जणांचा स्टाफ देखील उपस्थित होता.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सेटवर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे, असेही स्वराने सांगितले. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास स्वरा भास्कर लवकरच शीर कोर्माफ चित्रपटात छळकणार आहे. याशिवाय भाग बेनी भागमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.