कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांना त्यांच्या अंगरक्षकाच्या आत्महत्या प्रकरणात सीआयडीने चौकशीसाठी पाचारण केले असून त्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना सोमवारी सीआयडीच्या भवानी भवन कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
अधिकारी यांच्या अंगरक्षकाने स्वतावर गोळी चालवून आत्महत्या केली आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्त्नीने अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार सीआयडीने या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक स्थापन केले आहे.
या चौकशी पथकाने आत्तापर्यंत 11 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण पंधरा जणांची चौकशी केली आहे.
या प्रकरणी सीआयडीच्या पथकाने आधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊनही या आधी तपास केला आहे. हा अंगरक्षक खूप वर्षांपासून अधिकारी यांच्या सुरक्षा पथकात होता.