हिंगोली – मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती (स्टे) द्या.. शिंदे समिती भरखस्त करा तसेच कोणत्याही एका समाजाचं सर्वेक्षण न करता सर्व समाजाचे सर्वेक्षण करा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. हिंगोली येथे पार पडलेल्या ओबीसी एल्गार सभेत (Obc elgar sabha) भुजबळ बोलत होते. भुजबळांच्या या मागणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील भाष्य केलं आहे.
मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी राज्य सरकारने शिंदे समिती (Shinde samiti) स्थापन केली आहे. ही समिती बरखास्त करा, तसेच दोन महिन्यात जे कुणबी प्रमाणपत्र (kunabi Certificate) देण्यात आले आहेत,त्यानां स्थगिती (स्टे) द्या अशी मागणी भुजबळांनी केली. तसेच सर्वांची जनगणना करा.सर्वांचा सर्व्हे करा आणि मगच मागासलेपण ठरवा असंही भुजबळ हिंगोलीतील सभेत म्हणाले. (Dismiss Shinde Committee) आम्ही ओबीसींना विरोध केलेला नाही अशी भूमिका भुजबळांच्या या मागणीनंतर जरांगे यांनी व्यक्त केली आहे.
“ओबीसींना द्या.. आम्ही कधीही विरोध केला नाही.सत्तेत तुंम्हीच आहात ना..तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं घ्या.. एखाद पोत तुम्हाला घ्या,मधल्या काळात संपलं असेल तर आत्ता घ्या असा टोला जरांगेंनी यावेळी लगावला.माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी भुजबळांनी केलेल्या मागणीबाबत आपले मत व्यक्त केले. (Maratha Reservation)
जरांगे पुढे म्हणाले,”आम्ही कधीही ओबीसींना विरोध केलेला नाही.मग आम्हाला द्या तुम्हाला द्या कशाला ? सारथीची संख्या किती कमी झाली हे माहिती आहे का ? असा सवाल देखील यावेळी जरांगे यांनी उपस्थित केला. ओबीसी मधूनच आरक्षण घेणार त्याशिवाय एक पाऊल देखील मागे सरकणार नाही असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.