सुष्मिता सेन “लीव्ह इन’मध्ये रहायला लागली

सुष्मिता सेन आपल्या बॉयफ्रेंडबरोबर “लीव्ह इन’मध्ये रहायला लागली आहे, असे ऐकायला मिळते आहे. हा तिचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे आणि त्याचे नाव आहे, रोहमन शॉल. या दोघांच्या रिलेशनशीपबाबत गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरो होती. नेहमी बाहेर कोठेही जाताना हे दोघेही एकत्र जाताना दिसायचे. सोशल मिडीयावरही सुष्मिता आणि रोहमन या दोघांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळायची. दोघांचे रोमॅंटिक फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर नेहमीच व्हायरल होत राहिले आहेत.

रोहमन सध्या सुष्मिताच्या मुलींबरोबर वेळ घालवतो आहे तर कधी सुष्मिताबरोबर टाईमपास करतो आहे. त्याच्यात आणि सुष्मिताच्या दोन्ही मुलींमध्ये खूप चांगले ट्युनिंग जुळलेले बघायला मिळते आहे. रोहमन दररोजच बांद्रयात सुष्मिताच्या घरी यायचा. आता रोहमन शॉल सुष्मिताच्याच घरी रहायला आला आहे. रोहमन एक मॉडेल आहे आणि एका फॅशन शो दरम्यान त्याची आणि सुष्मिताची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली होती. बऱ्याच काळापासून सुष्मिताने कोणताही सिनेमा केलेला नाही. पण ऍड फिल्म्स आणि फिल्मी इव्हेंट्‌समध्ये ती नेहमीच सहभागी होत असते.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.