कतरिना कैफ आता ऍथलिटच्या रोलमध्ये

2019 हे वर्ष कतरिनासाठी खूपच खास आहे. एका बाजूला ती सलमान खानबरोबर “भारत’मध्ये असणार आहे. तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या बरोबर “सूर्यवंशी’मध्येही ती आहे. आता चक्क भारताची सुवर्णकन्या पी.टी.उषाच्या बायोपिकमध्ये ती धावपटूच्या रोलमध्ये असणार आहे. रेवती एस. वर्माच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या सिनेमामध्ये कतरिनाला या ऍथलिटचा रोल साकारायचा आहे.

रेवती एस. वर्मांनी यापूर्वी मल्याळम आणि तामिळमधील काही सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. तर अलिकडेच “आप के लिए है हम’चे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. जरी कतरिनाला पी.टी. उषाचा रोल ऑफर करण्यात आला असला, तरी कतरिनाने अद्याप तिचे उत्तर दिलेले नाही. मात्र ही संधी ती मुळीच वाया जाऊ देणार नाही. हा रोल ती स्वीकारण्याचीच जास्त शक्‍यता आहे. कतरिनाच्या आगोदर या रोलसाठी प्रियांका चोप्राचे नाव पुढे आले होते. मात्र प्रियांकानेही कोणतीही ठाम प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे रोल कॅटकडे आला आहे. पिलावुल्लकंडी थेक्केपराम्बील उषा अर्थात पी.टी उषाला “भारताची सुवर्ण कन्या’, “क्‍वीन ऑफ इंडियन ट्रॅक ऍन्ड फिल्ड’ आणि “पय्योली एक्‍सप्रेस’ या नावांनीही ओळखले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.