यावर्षी अनेक सिनेमांची रिलीज एकाचवेळेस होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवरच्या रिझल्टवर झाला. अक्षय कुमारचा “सूर्यवंशी’ आणि सलमाअ खानचा “इन्शाअल्ला’देखील एकाचवेळेस रिलीज होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र प्रत्यक्ष्यात दोन्ही सिनेमांच्या रिलीज डेट वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे अक्षय कुमारने समाधान व्यक्त केले.
वर्षातील 52 आठवड्यांमध्ये जवळपास 210 सिनेमे रिलीज होत असतात. जर प्रत्येक आठवड्याल एकच सिनेमा रिलीज केल्यास अन्य सिनेमांना रिलीज डेट मिळू शकणार नाही. पण “सूर्यवंशी’ आणि “इन्शाअल्ला’ ची टक्कर होणार नाही, हे चांगले आहे, असे अक्षयने म्हटले आहे. “सूर्यवंशी’ 27 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे. सलमानचा “इन्शाअल्ला’ही पुढच्या वर्षी याच कालावधीत रिलीज होणार आहे.
पण त्याची रिलीज डेट अद्याप निश्चित झालेली नाही. अक्षयचा “मिशन मंगल’देखील प्रेक्षकांचे आकर्षण बनतो आहे. त्याची रिलीज डेट देखील अद्याप निश्चित झालेली नाही. पण ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दोन सिनेमे एकाच कालावधीत रिलीज होणार नाहीत, असे अक्षयने म्हटले आहे. त्यातच “इन्शाअल्ला’ 27 मार्चला रिलीज होणार नाही, हे स्पष्ट होते आहे.