मुंबई – ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये अनेक राजकीय नेते तसेच सेलिब्रिटी हजेरी लावतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत गुप्ते करतो. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावल्याचं दिसून आलं आहे. यावेळी अवधूत गुप्ते त्यांना प्रश्न विचारताना दिसत आहे तर, सुप्रिया सुळे देखील या प्रश्नांची अतिशय दिलखुलास पणे उत्तरे देतात.
दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अवधुत गुप्तेनं त्यांना ‘सगळ्यात चांगला उपमुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस की अजित पवार’ असा प्रश्न विचारतात. तर अवधुतच्या या प्रश्नावर उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अर्थात, अजित पवार.’ त्यानंतर पुढे अवधुत गुप्ते सुप्रिया सुळेंना एक प्रश्न विचारतो की कोणत्या पुतण्याचं काका विरोधात असलेलं बंड योग्य होतं असं वाटतं? त्याच्या ऑप्शनमध्ये राज ठाकरे, धनंजय मुंडे की अजित पवार … मात्र, यावर आता सुप्रिया सुळे काय उत्तर देतील याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
अन् सुप्रिया सुळे झाल्या भावुक !
त्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे काही फोटो स्क्रिनवर दिसतात. त्यानंतर दिसते की, सुप्रिया सुळे या भावूक होतात. सुप्रिया सुळे यांना अवधुत गुप्ते म्हणतो, ‘तुम्ही कार्यक्रमाच्या आधी आम्हाला सांगितलं होतं की, आम्ही आमच्या भावना सगळ्यांसमोर दाखवू शकत नाही. पण आता काय सांगाल?’ असं देखील कार्यक्रमाच्या एका प्रोमोमध्ये पाहायला मिळालं आहे.