नवी दिल्ली – बलात्कार केल्यानंतर गर्भवती राहिलेल्या युवतीशी लग्न करण्यासाठी माजी कॅथॉलिक धर्मगुरू रॉबिन वडक्कुमचेरी याला अंतरीम जामीन देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळुन लावली. त्याचवेळी आरोपीला केरळ उच्च न्यायलयात जाण्यास सांगितले.
केरळमधील या बलात्कार पिडीतेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. फेब्रुवारी 2019मध्ये 20 वर्ष कारावासाची शिक्षा झालेल्या रॉबिनशी विवाह करायचा असल्याचे तिने म्हटले होते. त्याच्या शिक्षेनंतर चर्चने त्याला धर्मगुरूपदावरून बेदखल केले होते.
वेडाक्कुमेमेचेरी धर्मगुरू कार्यरत असलेल्या चर्चशी संबंधित कॅथॉलिक कुटुंबातील ही मुलगी होती. 2016 मध्ये ही घटना घडली तेव्हा या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. वेडाक्कुमेमेचेरीकडे काही डाटा एन्ट्रीचे काम करण्यासाठी जात होती.
त्यावेळी अन्य मुली गेल्यानंतर वेडाक्कुमेमेचेरीने तिला बेडरूममध्ये नेऊन बलात्कार केला. ही गोष्ट कोणाला न सांगण्याची धमकी दिल्याने तिने ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र त्या बलात्कारातून ती गर्भवती राहिल्याने ही बाब उघड झाली.